Advertisement
घाटकोपर : मुंबईमध्ये सोमवारी पावसाने आणि वादळी वाऱ्याने घाटकोपर येथे लोखंडी होर्डिंग पेट्रेल पंपावर पडल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. आता मृतांचा आकडा वाढला असून घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहे.
एनडीआरएफ, अग्निशामक दल, महानगर पालिकेची यंत्रेना गेल्या ६३ तासांपासून बचाव कार्य राबाबत होते. हे बचाव कार्य ६३ तासांनंतर थांबवण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली.
घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यावर मोठ्या प्रमाणात बचाव कार्य राबवण्यात आले. हे बचाव कार्य ६३ तास सुरु होते. या घटनेत १६ नागरिक ठार तर ७५ जण जखमी झाले आहेत.