Advertisement
नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने काल अटक केली. या प्रकरणावर आता खुद्द अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
आपले जीवन देशाला समर्पित आहे,असे केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे. ईडीने केजरीवाल यांना आज (शुक्रवारी) राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केले.
यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर आम आदमी पार्टीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करत संताप व्यक्त केला. तसेच विरोधकांच्या I.N.D.I.A.आघाडीतील नेत्यांनीही केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत भाजप आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.