– तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,ऊर्जा व पालक मंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते मातोश्री वसतिगृहाचे उद्घाटन
रामटेक – कविकुलगुरू संस्कृती विश्वविद्यालय रामटेक येथे, मुलींसाठी मातोश्री छात्रावास इमारतीचे उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री मा. उदय सामंत यांचे हस्ते मातोश्री वसतिगृहाचे उद्घाटन झाले. उद्घाटनपर भाषणात उच्च तंत्रशिक्षनमंत्री उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले ” विश्वविद्यालय हे संस्कृत भाषा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य उत्तमरीत्या करत असून, आमचे सरकार विश्वविद्यालाच्या पाठीशी असून, सर्व सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऊर्जा व पालक मंत्री डॉ नितीन राऊत उपस्थित होते.
ते आपल्या भाषणात म्हणाले की “एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब साक्षर होते” या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तत्वाचा अंगीकार करून विश्वविद्यालयाने मुलींच्या निर्भय निवासाकरिता व आनंद पूर्ण शिक्षणासाठी वसतिगृहाची उत्तम व्यवस्था केल्याचे पाहून आनंद झाला.
या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी , रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल , उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता ,महा.चे रुसा संचालक पंकजकुमार माजी आमदार आनंदराव देशमुख ,माजी आमदार माल्लिकार्जून रेड्डी , मान्यवर , अधिकारी, कर्मचारी, सर्व प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते.