Published On : Thu, Oct 11th, 2018

वाहनाच्या धडकेत हरिणाचा मुत्यु

कन्हान : – नागपुर जबलपूर चारपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बंद टोल नाका महामार्ग पोलीस चौकी समोर अगदी शंभर मिटर अंतरावर नागपुर कडुन येणाऱ्या अञात वाहनाच्या धडकेत एका हरिणाचा मुत्यु झाला.

गुरुवार (दि.११) ला दुपारी एक वाजता दरम्यान कन्हान पासुन अवघ्या सहा कि.मी.वर नागपुर जबलपूर चारपदरी राष्ट्रीय महामार्गावरील वराडा बंद टोल नाका महामार्ग पोलीस चौकी समोर अगदी शंभर मिटर अंतरावर नागपुर कडुन येणाऱ्या अञात वाहनाने महामार्ग पार करित असलेल्या एका हरिणा जोरदार धडक मारून गंभीर जखमी केले . व त्यास रस्त्याच्या बाजुला मरणागत सोडुन वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाला .

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही वेळ तडफुन हरिणाचा मुत्यु झाला. महामार्ग पोलीस चौकीच्या पोलीस कर्तव्यदक्ष असते तर त्या हरणाचे प्राण सुध्दा वाचु शकते . तसेच आरोपी वाहन व चालक सुध्दा सापडला असता . परिसरातील प्रवाशानी पोलीस चौकी च्या शिपायांना सांगितले असता वन विभागाच्या कर्मचा-यांचा मोबाईल नबंर नसल्याचे सागुन आगा बाहेर केल्याचे लक्षात येताच कन्हान पोलीस स्टेशनला माहीती दिल्यावर ३.३० वाजता दरम्यान वनविभागाच्या कर्मचा-यांनी त्या मुत हरिणाला सोबत घेऊन गेले .

वराडा बंद टोल नाका येथील महामार्ग पोलीस चौकी असताना सुध्दा जवळपास अपघात झाल्याचे त्याना माहीत नसते . महामार्गावर अपघात झाल्यास हे पोलीस उशिरा पोहचत असते.

या चौकी समोर २९ जुन २०१८ ला याच जागेवर गोंडेगावचे उपसरपंच विनोद सोमकुंवर यांची कार थांबवुन हत्या करण्यात आली . तेव्हाही कुठलीही कामगिरी बजावली नाही. फक्‍त सकाळी वाहने थांबवुन वसुली करण्यात तरबेज दिसतात. या चौकीपासुन जाणारे अवैध जनावरांचे , चोरीच्या वस्तुचे वाहने कन्हान कामठी ला पकडली जातात . परंतु आज पर्यंत एकही वाहन पकडल्याचे दिसुन आले नाही . यामुळे ही महामार्ग पोलीस चौकी व कर्मचारी कुचकामी , निष्कामी ठरत आहे .

Advertisement