नागपूर: तेलंगणा राज्याच्या विविध शहरांतील महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदींनी गुरूवारी (ता. ६) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. नागपुरात महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याची प्रशंसा केली.
शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त आर. झेड सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, अनिरूद्ध चौंगजकर आदी उपस्थित होते.
तेलंगणा राज्य शासनाच्या आर.सी.व्ही.ई.एस. या कार्यक्रमाअंतर्गत तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, निजामाबाद, खंबम्, करीमनगर, मेहबूबनगर, सूर्यपेठ, रामगुंडम्, सिद्धीपेठ या शहाराचे महापौर रवींद्र संग, गोगुलाल पापालाल, ए. सुजाता नगराध्यक्ष मनीषा, राधा, के.व्ही. रामना, नागेश्वर राव, बी. श्रीनवास, जॉन सॅमसंग यांच्यासह आर.सी.व्ही.ई.एस.चे समन्वयक ईसंट लेसली, डॉ. श्रीनवासन यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी नागपूरच्या स्वच्छतेची, हिरवळ, २४ बाय ७ पाणी पुरवठा प्रकल्पाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दोन दिवसांपासून नागपूर मुक्कामी असलेल्या शिष्टमंडळांने भांडेवाडी येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली व त्याची प्रशंसादेखील महापौरांकडे केली. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.