कामठी:-नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहर हे तालुकादर्जाप्राप्त असून या शहरात महत्वाचे असलेले कामठी तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ,पंचायत समिती कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह विविध शासकीय निमशासकीय कार्यालये असून शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना उपयोगी पडणारे सोयी सुविधात्मक कार्यालये हे कामठीत आहेत मात्र येथील उपविभागोय कार्यालय हे मौदा शहरात आहे.या कार्यालयाशी संबंधित शेतकरीवर्ग, विद्यार्थीवर्ग तसेच व्यापारी वर्गांना उपविभागोय कार्यालयाशी संबंधित महत्वच्या कामासाठी ‘मौदा’येथील उपविभागोय कार्यालय गाठावे लागते .
दरम्यान कामठी-मौदा महामार्गावरील मौदा गावाच्या अलीकडे असलेल्या टोल नाका गाठून जावे लागते.या टोल नाक्यावरून वाहतूक दारांकडून मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो बहुधा हा टोल देण्यावरून शाब्दिक वाद हा हाणामारीत होतो कित्येकदा या टोल नाक्यावरुन वाहतूक दारणा अपमानित सुद्धा करण्यात येतो तेव्हा यासंदर्भात सदर परिस्थितीची गांभीर्याने जाणीव घेत हा टोल नाका येथुन स्थानांतरण करून मौदा गावासमोर नेण्यात यावा .15 ऑगस्ट पर्यंत हा टोल नाका न हटविल्यास नागरिकांतर्फे आमरण उपोषण करणार असल्याचा तीव्र इशारा कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसर येथील टोल नाका हटविण्याचे आश्वासन रामटेक वासीयांना दिले होते ते आश्वासन त्यांनी पूर्ण करून आपला शब्द पाळला आहे आता याच धर्तीवर सावनेर तसेच कामठी तालुक्यातील टोल हटवावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
संदीप कांबळे कामठी