नवी दिल्ली:दिल्ली विधानसभा. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक इंडिया आघाडीमधील काँग्रेस आणि आप या पक्षांनी स्वतंत्रपणे लढली होती. दरम्यान आज सुरू असलेल्या या मतमोजणीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असे चित्र दिसत आहे.
मतमोजणीला ३ तास पूर्ण होत असताना दिल्लीत आकडे स्थिरावले असून, भाजपा ४० आणि आप ३० जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.
बहुमातकडे वाटचाल करत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. ९४.६ लाख मतदारांनी राजधानी दिल्लीचा निर्णय मतपेटीत बंद केला. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनणार की भाजप २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.