– नासुप्र सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन
नागपूर : नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी कमीत कमी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित ‘नागपूर सुधार प्रन्यास’चे कार्यलय सुरू आहे. येत्या ३१ मे पर्यंत (शासकीय आदेशानुसार) नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंदी आहे. त्यामूळे यावर्षी नासुप्र’च्या सर्व प्लॉट धारकांनी त्यांच्या ‘ग्राउंड रेंट’ची डिमांड NIT’च्या http://nitnagpur.org या अधिकृत वेबसाईटवरून काढावयाची आहे, व त्यानंतर ही डिमांड ऑनलाईन भरावे असे आवाहन ‘नासुप्र’चे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.
‘एनआयटी’च्या अधिकृत वेबसाईटवरून ‘ग्राउंड रेंट’ची डिमांड कशी काढायची या संबंधित सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिमांड काढण्यासाठी लागणारे ‘अकाऊंट आय डी’ हा प्लॉट धारकांच्या गेल्या वर्षीच्या ‘ग्राउंड रेंट’च्या डिमांडवर उपलब्ध आहे, याची प्रत्येकांनी नोंद घ्यावी. वेबसाईटवरून डिमांड डाउनलोड केल्यानंतर डिमांडची रक्कम शक्य असल्यास ऑनलाईन जमा करावी. तसेच ज्या नागरिकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन डिमांड भरता येत नसल्यास त्यांनी आपली डिमांड जवळच्या युनियन बँकेच्या शाखेत जाऊन भरावी. ग्राउंड रेंट डिमांड संदर्भात संपूर्ण प्रक्रियेची माहिती ‘NIT’च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.