कन्हान : – भारतीय जनता पार्टी पारशि वनी तालुका अध्यक्ष श्री. अतुल भाऊ हजारे यांच्या नेतृत्वात कोरोना वायरस च्या वाढत्या प्रभावापूर्वी परिसरात योग्य त्या उपाययोजना करून दक्षाता घ्यावी या अनुषंगाने कन्हान नगरपरिषद, प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान, ग्रामपंचायत कान्द्री च्या आरोग्य अधिकाऱ्यांना निवे दन देऊन मागणी करण्यात आली.
या वेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते श्री. राजेंद्र शेंदरे, मनोज कुरडकर, राजेश पोटभरे, शैलेश शेळके, सौरभ पोटभरे, प्रवीण माने, पिंटू निम्बूळकर, ग्राम पंचाय त सदस्या सौ.अरूनाताई हजारे, सौ. विभाताई पोटभरे, बाबा यादव सह मोठ्या प्रमाणात गावकरी नागरिक भगिनी उपस्थित होत्या.