कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनास नागरिकांचे निवेदन
कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग ४ मध्ये विविध समस्या असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील नागरिकांनी भाजपा कन्हान शहर प्रसिध्दी अध्यक्ष प्रमुख ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली आहे .
नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्र ४ मध्ये गेल्या काही दिवसा पासुन कचरा घंटागाडी येत नसल्याने नागरिक आपल्या घरासमोर कचरा टाकत आहे. ज्यामुळे प्रभागात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद व्दारे प्रभागात कचरा संग्रहित करण्याकरिता डस्टबिन वितरित करण्यात आल्या परंतु प्रभाग ४ मध्ये एकही घरी डस्टबिन मिळाला नाही. तसेच लहान मोठय़ा सर्व नाल्या काही दिवसा पासुन साफसफाई करण्यात येत नसल्याने नाल्याच्या जमा पाण्याची दुर्गंधी पसरून रोगराई होऊन नागरिकां च्या स्वास्थास धोका निर्माण झाला आहे.
यामुळे भाजपा कन्हान शहर प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर व नागरिकांनी सत्ताधारी पक्षाच्या कामका जावर व कार्यकाला विषयी नाराजी व्यकत केली आहे. यास्तव नगरपरिषद कन्हान-पिपरी नगराध्यक्ष शंकरराव चहांदे , मुख्याधिकारी हयाना निवेदन देऊन प्रभाग ४ च्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात भाजपा कन्हान शहर महामंत्री अमोल साकोरे, प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, प्रल्हाद बावनकर, शुभम बावनकर, राजु भनारकर, नितिन रंगारी, हर्ष पाटील, चंदन मेश्राम, शाहरूख खान आदी नागरिक उपस्थित होते.