बेला : उमरेड तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हटलं की बेला . ग्रामपंचायत हद्दीत अथवा परिसरात मुख्य बाजार पेठ मध्ये एखाद्या ठिकाणी वाहनांचा अपघात झाला किंवा एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने एखादा गुन्हा केला किंवा ग्रामपंचायत हद्दीत एखाद्या ठिकाणी दरोडा पडला किंवा चोरी झाली तर तो सी सी टीव्ही कॅमेराच्या माध्यमातून त्वरित ग्रामपंचायतच्या लक्षात येईल शिवाय ह्या कॅमेराच्या माध्यमातून पोलिसांना योग्य तो तपास करता येईल.
आठवडी बाजाराच्या दिवशी पॉकेट मार, मोबाइल चोरट्यावर आळा घालण्या करीत कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी व बेला ग्रामपंचायत अधिक सक्षम व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होण्यासाठी व बेला ग्रामपंचायत हद्दीतील, परिसरातील मालमत्तेचे संरक्षण, संवर्धन होण्यासाठी बेला ग्रामपंचायत हद्दीत सी सी टीव्ही कॅमेराची नितांत गरज आहे. बेला ग्रामपंचायतची सध्याची परीस्थिती पाहता सी सी टीव्ही कॅमेरा सर्वत्र लावणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हे सी सी टीव्ही कॅमेरा लावणे ग्रामपंचायतच्या आवाक्यातही आहे.
त्यामुळे जनतेच्या, सर्वसामान्य व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टीव्ही कॅमेरा आपल्या परिसरात व गावात मुख्य मार्गावर बाजारपेठेत व मुख्य चौकात बसविण्यात यावे अशी मागणी बेला गावकऱ्यांनी बेला ग्रामपचायतला बेला गावकरी करणार आहे तसेच बेला हद्दीत अनेक स्ट्रीट लाईट व लावलेली सिरीज बंद पडले आहेत ते त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी गावकरी ग्रामपंचायत प्रशासना कडे करीत आहे
*चेतनसिंग चव्हाण
*ठाणेदार पोलीस स्टेशन बेला
होणाऱ्या काळात कुठे मोठा गुन्हा घडू नये व मुख्य बाजारपेठ येथे सी सी टीव्ही कॅमेरा ची नितांत गरज आहे . मी स्वतः ग्रामपंचायत बेला व बेला व्यापारी संघ यांना पोलीस स्टेशन बेला कडून प्रस्ताव पाठवणार आहो व मुख्य बाजारपेठ तील व्यापारी यांना बोलावून मिटिंग घेऊन सी सी टीव्ही कॅमेरे प्रत्येक दुकानात बसवण्याकरी सांगून प्रत्येक व्यापाऱ्याने कॅमेरे बसबण्याकरिता विनंती करील
माजी ग्रामपंचायत सदस्य
*राजेश मरस्कोले*
बेला गावाची लोकसंख्या 20 हजाराच्या घरात आहे बेला गावाला कमीत कमी 40 खेडे लागून आहे खेड्यातील लोकांना बेला बाजार पेठ मध्ये नेहमी यावे लागतात बेला बाजार पेठेत कॅमेरे लावणे महत्वाचे आहे व बेला ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन बेला येते मुख्य मार्गावर बाजारपेठेत सी सी टीव्ही कॅमेरा लावणे आवश्यक आहे
गजानन लांडे सामाजिक* *कार्यकर्ते
सी सी टीव्ही कॅमेरे बसवण्या करीत बेला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत ला लेखी निवेदन देऊन ग्रामपंचायत ला कॅमेरे लावण्या करीत सांगणे व भविष्यात होणाऱ्या गुन्हा घडू नये जर घडला तर कॅमेरा च्या माध्यमातून पोलिसांनी चॉकशीकरिता सोपे जाईल