नागपूर: मनपा मुख्यालयात ६ जानेवारी रोजी “लोकशाही दिन” आयोजित करण्यात येणार आहे. या दिनी जनतेच्या तक्रारी, अडचणी व गा-हाणी ऐकण्याकरिता व त्यांचा निपटारा केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दि. ३० डिसेंबर १९९९ चे शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारीचे निराकरण करण्याचे दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार हा “लोकशाही दिन” म्हणून आयोजित करण्यात येते.
या कार्यक्रमात जनतेच्या तक्रारी लिखीत स्वरुपात घेण्यात येतात व पुढील महिन्याभरात या तक्रारीचे निराकरण करण्यात येते. तसेच मा. विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीचे मनपात प्राप्त होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली काढण्याचे निर्देशित केल्यानुसार सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागात (पहिला माळा) “लोकशाही दिन” आयोजित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सोमवार दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. सर्व कक्ष प्रमुख व झोन क्रमांक १ ते १० मधील सहा.
आयुक्त यांनी यापूर्वीच्या विभागीय लोकशाही दिन व म.न.पा. लोकशाही दिनांतर्गत प्राप्त तसेच निकालात न निघालेल्या तक्रार अर्जाचे सर्व माहितीसह जनतेच्या तक्रारी, अडचणी व गा-हाणी ऐकण्याकरीता व त्यांचा निपटारा करण्याकरीता माहितीसह उपस्थित राहावे असे आदेश मा. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहे.