म्हणाले श्रीमंतांबद्दल सामान्यांमध्ये चीड
नागपूर: नोटाबंदीच्या काळात गरिबांना त्रास झाला, अशी कबुली केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात राष्ट्रीयता कारागीर पंचायतच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या काळात सर्वसामान्यांना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला.
नितीन गडकरी यांनी यावेळी रामदेव बाबांच्या संपत्तीचाही उल्लेख केला. रामदेव बाबांना त्यांच्या नावावर कोणतीच संपत्ती न ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. रामदेव बाबा अनेक वस्तू बनवतात. त्यांच्या उद्योगाची उलाढाल 70 हजार कोटींच्या घरात गेली आहे. रामदेव बाबांना मी सांगितले, की सामान्य लोक तुम्हाला खूप श्रीमंत समजतात. समाजात अती श्रीमंतांबद्दल चिड असते. म्हणून रामदेव बाबांनी त्यांच्या नावावर एकही रुपया ठेवलेला नाही. ते फक्त सामाजिक उद्यमशीलता करतात, असे गडकरींनी सांगितले.
सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना ते म्हणाले, जोपर्यंत लोकं सरकारला धक्का मारुन जागे करत नाही, तोपर्यंत कोणतेही सरकार कामाला लागत नाही. सरकार बंद पडलेल्या ट्रक किंवा बससारखे असते. जोवर तुम्ही धक्का मारत नाही, तोपर्यंत बॅटरी चार्ज होत नाही.