कन्हान : – शहरात केंद्र सरकार द्वारे सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदनी कायदा रद्द करण्यात यावा. या मागणीसह संविधान बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार (दि.२५) ला गांधी चौक कन्हान येथुन मोहम्मद अली आजाद व शेख अकरम कुरेशी यांच्या नेतुत्वात संविधान बचाव मोर्चा डॉ. आबेंडकर
चौक, लालबहादूर शास्त्री चौक, डॉ बाबा साहेब आंबेडकर नगर नाका नं.७ पासुन मुख्य महामार्गाने भ्रमण करित भारतीय संविधान जिंदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
जनतेला त्रास देणे बंद करून सर्वसामान्याच्या विकासा करिता वाटचाल करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा कन्हान पोलीस स्टेशन ला पोहचुन निवेदन देण्यात आले. मोर्चात बहुतांश मुस्लिम व सर्व समाज बांधव हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते.
रैली मध्ये प्रामुख्याने व्यापारी संघाचे अक्रम शेख, मोहम्मद अली, अनीस सिद्दिकी, नफीस खान, चॉंद खान, राष्ट्रवादीचे नेते चंद्रशेखर भिमटे, श्री कैलास बोरकर, अखिलेश मेश्राम, रोहित मानवटकर शाहीद रजा़, लतीफ भाई, फिरोज भाई, मोबीन भाई, ईस्माईल भाई, राजेश यादव, फैय्याज खान, गौस मोहम्मद, अजीम भाई,देवाजी येलमुले, प्रकाश साकोरे, अशोक पाटील, आकीब सिद्धिकी, जिब्राइल शेख, रसीद पठाण आदी मोठया संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी कमल यादव)