Advertisement
वाडी(अंबाझरी) : जिल्हा आरोग्य यंत्रणा वाडीत डेंग्यु आजारावर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागली असतांनाही वाडीत डेंग्यु थांबायचे नाव घेत नाही अशी परिस्थिती झाली आहे.
आज पलाॅट क्र. 40 धममकिर्तीनगर दत्तवाडी येथील महिला शुभांगी विषणुपंत वाघमारे वय 36 वर्ष हिचा डेंग्युने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे अहवालावरून निदर्शनास आले.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार शुभांगी हिला चार दिवसाआधी ताप आला होता,तीला वाडी येथील वेल ट्रीट रूगणालयात दाखल केले. तीने सुरवातीपासुन उपचाराला प्रतिसाद दिला नाही व आज सकाळी पहाटे 3. 24 वा तीचा मृत्यू झाला,डॉक्टरांनी तीच्या मृत्यूचे कारण डेंग्यु सांगितले आहे.