नागपूर : शहरात डेंग्यू आजराने थैमान घातले आहे.आतापर्यंत डेंग्यूग्रस्तांची संख्या तीनशेच्या पार गेली असून दोन संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यूचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
मागील पंधरा दिवसांत शहरातील सर्वेक्षणात २,८४३ घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.
नागपुरात १ जानेवारी ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान ३ हजार ९३ संशयितांची नोंद झाली. त्यापैकी ३०० जणांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. गेल्या दीड ते दोन महिन्यांतील ही रुग्णांची संख्या आहे.
दुसरीकडे वर्धा मार्गावरील पायनियर रेसिडेन्सी पार्क, सोमलवाडा येथेही एका तिसऱ्या डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात दाखल होता. या रेसिडेन्सीमध्येही बरेच डेंग्यू संशयित रुग्ण आहेत. ही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्यावरही अद्याप कोणतीही पाऊले उचलण्यात आली नाही.
image.png