नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) युनिटद्वारे विद्यार्थ्यांसाठी ब्रह्माकुमारीज विश्वशांती सरोवर , जामठा येथे दोन दिवसीय निवासी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी ब्रह्माकुमारीज केंद्र येथे दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात लाभ घेतला. विद्यार्थ्यांना अध्यात्मिक पैलू समजावून दैनंदिन जीवनात सकारात्मकतेचे महत्व व त्याचे स्वतः व रुग्णसेवेवर होणाऱ्या प्रभावी फायद्यांबाबद विविध उपक्रमाच्या माध्यमातू सांगण्यात आले. यावेळी डॉ उल्हास , डॉ निर्मल आणि डॉ प्रियल यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्याने तसेच ध्यानसाधनेचे विविध प्रात्यक्षिके घेण्यात आले .
सर्व स्वयंसेवकांनी जामठा आणि वागधरा ग्रामपंचायती ना भेट देऊन ग्रामपंचायत सरपंचयांना भेटून तेथील कार्यप्रणाली समजून घेतली.ग्रामसेवक व ग्रामपंचायतीतील इतर मान्यवरांसोबत स्वयंसेवक विद्याथ्यांनी ग्रामस्थांशी त्यांच्या घरी जाऊन संवाद साधला.याद्वारे ग्रामीण जीवनाशी सर्व स्वयंसेवकांना एकरूप होण्याची संधी मिळाली .तसेच गावातील महिला व लहान मुले यांच्या समस्या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी समजून घेतल्या. प्रशासकांना त्या अभिव्यक्त करून दाखविल्या. या शिबिरादरम्यान रासेयो स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत आवारात ग्रामस्थांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या दुष्परिणांबाबत जनजागृती केली. गावातील महिला व लहान मुले यांना मुख व दंत आरोग्याविषयी प्रात्यक्षिके दाखवून एकूणच आरोग्य संदर्भात माहिती दिली. सर्व स्वयंसेवकांनी वैनगंगा इंजिनीरिंग कॉलेज भेट देऊन विद्यार्थ्यांना ब्रशिंग technique चे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच मुख पूर्वकर्करोगाची लक्षणे आणि उपचार याबाबत मार्गदर्शन केले आणि दंत व मुख चिकित्सा आणि उपचार करण्यात आले.
शिबिरात जामठा, वागधरा या गावांमधील तसेच वैनगंगा इंजिनीरिंग कॉलेज येथे ५०० रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी व १२५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी माननीय अधिष्ठाता डॉ अभय दातारकर, ब्रह्माकुमारीज मुख्य प्रशासिका बीके रजनी यांचे सहकार्य लाभले.हे शिबीर आयोजित करण्यास डॉ वंदना गडवे ( रासेयो कार्यक्रम अधिकारी ), डॉ वैशाली सार्वे, डॉ अनिकेत धोटे यांनी परिश्रम घेतले.