Published On : Mon, Jul 6th, 2020

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील बिबट (मादी) च्यामृत्यू बाबत विभागीय स्पष्टीकरण

Advertisement

नागपूर: ओतुर वनपरिक्षेत्र जुन्नर वनविभाग, जुन्नर या ठिकाणी मानवी पशुधनावर हल्ला केल्यामुळे माहे मे, २०१५ मध्ये ५ बिबट बंदिस्त केले होते. तदनंतर सदर पाचही बिबट माणिकडोह बिबट बचाव केंद्र, जुन्नर येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतरसदर पाचही बिबट मा. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सचिव सदस्य, महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नागपूर यांचे आदेशान्वये दि. ०३.०९.२०१६ रोजी वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आले होते.मागील जवळपास ४ वर्षापासून सदर पाचही बिबटांचे संगोपन योग्य रित्या सुरु आहे. सदर बिबट्यापैकी एक बिबट (मादी) वय अंदाजे १२ वर्षे ची प्रकृती दि. ०५.०७.२०२० रोजी अचानक बिघडल्यामुळे वन्यप्राणी बचाव केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर बिबट (मादी) वर उपचार सुरु केले.

परंतु आज दुपारी ०३:०० वाजता उपचारादरम्यान सदरबिबट (मादी) मृत्यू झाला.सदर बिबट (मादी) चे शवविच्छेदन आज रोजी डॉ. माधुरी हेडाऊ,डॉ. भाग्यश्री भदाणे, डॉ. मयूर पावशे व डॉ. शालिनी ए. एस. सर्व वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांचेकडून करण्यात आले.त्यानंतरसदर बिबट (मादी) च्या शवाचे दहन करण्यात आले.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वन्यप्राणी बचाव केंद्रामध्ये सध्यस्थितीत ९ वाघ, २३ बिबट व १० अस्वली कायमस्वरूपी संगोपणासाठी ठेवण्यात आलेले आहेत. याआधी कायमस्वरूपी संगोपनातील ठेवण्यात आलेल्या बिबटपैकी १ बिबट दिनांक १५.१२.२०१८ रोजी छातीमधील मोठा पु असलेल्या फोडामुळे व१ बिबट दि. ३१.१२.२०१८ रोजी वृध्दाकाळ व मृत्रपिंड निकामी झाल्यामुळे मरण पावला होता. त्यानंतर आज दि. ०५.०७.२०२० रोजी जवळपास दीड वर्षांनी कायमस्वरूपी ठेवलेल्यामादी बिबटाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन चमूच्या प्राथमिकनिरीक्षणानुसार मृत्यू Hepatorenal Failure मुळेझालेला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.शवविच्छेदन अहवालानंतर निश्चित कारण स्पष्ट होईल.

उक्त कार्यवाही नंदकिशोर काळे, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रकल्प, नागपुर,एच.व्ही. माडभुषी, सहाय्यक वनसंरक्षक, गोरेवाडा प्रकल्प, नागपुर,निलय भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी,राजू वलथरे, वनपाल व एच.एम. किनकर, वनरक्षक, वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपुर यांचेसमोर करण्यात आली.

Advertisement
Advertisement