Published On : Fri, Sep 8th, 2023

अखेर देवेंद्र फडणवीसांना मोठा दिलासा; ‘त्या’ आरोपातून न्यायालयाने केले दोषमुक्त

Advertisement

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नव्हती.याविरोधात न्यायालयात खटला सुरु होता. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. या आरोपातून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी फडणवीस यांना दोषमुक्त केले आहे.

फडणवीस यांनी कुठल्या हेतूने हे गुन्हे लपवले हे सिद्ध होत नसल्याने त्यांना या आरोपातून दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायाधीश एस. एस. जाधव यांनी सांगितले.

Advertisement

फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात या दोन गुन्ह्यांहूनही गंभीर गुन्ह्यांची नोंद कारण्यात आली आहे. पण केवळ नजरचुकीने दोन गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे राहून गेले, असा युक्तिवाद फडणवीसांच्या वकिलांनी केला होता.