कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ‘रामायणा कल्चरल सेंटर’ या संग्रहालयाला उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी भेट दिली व या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महालक्ष्मी जगदंबा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
भारतीय विद्या भवन द्वारे निर्मित अतिशय देखण्या दोन माळ्यांच्या या रामायणा कल्चरल सेंटर मधून प्रभू श्रीराम जन्म आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला आहे. लवकरच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी या कल्चरल सेंटरचे लोकार्पण करणार आहेत. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री मा. फडणवीस यांनी प्रशासनाकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला. यासोबतच महालक्ष्मी जगदंबेचे मंदिरात आई जगदंबेचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार टेकचंद सावरकर, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन, एनएमआरडीए आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, भारतीय विद्या भवनचे राजेंद्र पुरोहित, महादुलाचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत, महालक्ष्मी जगदंबा मंदिराचे सर्व विश्वस्त, महाजेनको अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.