नागपूर : बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे काल पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.तर दुसरीकडे सोशल मीडियावर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचे समर्थन करण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर ‘देवाचान्याय’ असा ट्रेंड सुरु आहे. देशभरातील एक्सवर ट्रेंडमध्ये देवाचान्याय पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसून येत आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अशा प्रकारच्या हजारो पोस्ट केल्या जात आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला विरोध-
या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. बलात्कार करणाऱ्यांना जागच्या जागी शिक्षा मिळाली पाहिजे, ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती. राज्यात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलंय त्यातून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं आहे का? हे साधे प्रकरण नाही.
न्यायालयीन कोठडीला गुन्हेगार आहे ज्याचा खटला तुम्ही फास्टट्रॅक कोर्टात चालवणार आहात आणि त्याला फाशी देणार आहात. त्याचं तातडीने एन्काऊंटर करण्याची गरज का पडली? याचे उत्तर द्यावे. कोणी पळून जात नव्हते. पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेवरील पिस्तुल कसं काढेल? एवढेच आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.