नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमचा भूमिपूजन सोहळा १८ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजनानंतर मुख्य कार्यक्रम देशपांडे सभागृहात पार पडेल. याच कार्यक्रमानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पर्यावरणमंत्री आणि ठाकरे सेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे हे सर्वजण एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यामुळे मंचावर राजकीय नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्यांनी कार्यक्रमात येण्यासाठी होकार दिला नाही.