.नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे जाहीर केल्याची चर्चा होती. परंतु फॉर्म्युला निश्चित झाला नसून मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले आहे.
राज्यात भाजप लोकसभेच्या २६ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला मिळून २२ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला –
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून बैठकांचे सत्र सुरू असतानाच महायुतीकडूनही युद्ध पातळीवर बैठका सुरू आहेत.आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीत थेट जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली.तीन पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट केले.या जागावाटपावर लवकरच शिक्कामोर्तब होईल,असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यात महायुतीला ४० ते ४२ जागा मिळतील – राज्यात भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसची सत्ता आहे.आमचे राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यात महायुतीला ४० ते ४२ जागा मिळतील,असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. आमच्यात कोणतेही मतभेद नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार मजबूत –
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार एकजूट असल्याचे फडणवीस म्हणाले.राज्यात नेतृत्व बदलाचा कोणताही विचार नाही. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी माझ्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन,अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.