मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. सदाकदा तो धर्माचा आधार घ्यायचा आणि तो क्रूर शासक होता.
आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा ते धर्माचा आधार घेत आहेत. दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार समान आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठे राजकीय नेते अडचणीत सापडले .
निष्पाप लोकांच्या हत्या होत आहे. खासदारांच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. हा प्रकार दुर्दैवाने महाराष्ट्रात सुरू आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे.
क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते,असे सपकाळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाका असे ते सांगत आहेत, याचा अर्थ यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा असल्याचा घणाघात सपकाळ यांनी केला.