नागपूर. मागील अडीच वर्षांपासून केवळ ओबीसी आरक्षणाच्या नावावर राज्यातील ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यात आली. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सत्तेची सुत्रे हाती घेताच लोकहिताच्या निर्णयांचा धडाका लावला. यातच उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. राज्यातील कोट्यवधी ओबीसी बांधवांच्या हक्कासाठी लढा देत त्यातून मार्ग काढणारा खरा ओबीसींचा राखणदार उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हेच आहेत, अशी प्रतिक्रिया नागपूर शहराचे माजी महापौर भाजपा नेते श्री. संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ललकारी देत प्रत्यक्षात शब्द खरा करून दाखविणारा लोकनेता म्हणूनही श्री. संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा गौरव केला.
रखडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलने झालीत, उपोषण करण्यात आले. मात्र राज्यातील तिघाडी सरकारला ओबीसी समाजाची बाजू सक्षमपणे न्यायालयापुढे मांडता आली नाही. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीपासूनच सर्वसमावेशक आणि सर्वांना समान न्यायाची भूमिका ठेवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठीच कार्य केले. ओबीसी आरक्षणाच्या विषयावर ओबीसी जनताही श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच विश्वासाने पाहत होती. शेवटी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तो विश्वास सार्थ करून दाखविला.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच या सरकारने बंठिया आयोगाचा अहवाल न्यायालयात सादर करून ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून दिले, असेही श्री. संदीप जोशी म्हणाले.