नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मोठे अपयश आले. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेत मला पदमुक्त करा अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली. यावरून फडणवीसांची मनधरणी सुरु झाली असून अनेक नेत्यांनी त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगितले आहे. तरीही फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या घडामोडीवरून फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी नागपूरहून दिल्लीला निघाले आहेत.
नागपूर विमानतळावर पत्रकारांनी फडणवीस यांना घेरले. मात्र त्यांनी यादरम्यान बोलणे टाळल्याची माहिती आहे. राज्यात ठाकरे सरकार पाडून भाजपने शिंदे गटाशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते.
तेव्हा देखील फडणवीस यांनी बाहेर राहून पक्षासाठी काम करण्याची भूमिका घेतली.आता पुन्हा त्यांनी याच प्रकारची भूमिका घेतल्याने भाजप श्रेष्ठीदेखील चिंतेत असल्याची माहिती आहे.
अमित शहा यांनी तातडीने फडणवीसांना दिल्लीत येऊन बोला, असा निरोप दिला आहे.आता फडणवीस उपमुख्यमंत्री राहतात की भाजपाचे पुन्हा प्रदेशाध्यक्ष होतात याची चर्चा रराजकीय वर्तुळात सुरु आहे.