नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले. एक नेता एक पद या धोरणानुसार सध्या भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे मोदींच्या मंत्रिमंडळातही मंत्री आहेत. त्यामुळे भाजपा नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात आहे. भाजपच्या या महत्त्वाच्या पदावर कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रातून या पदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर येत आहे. फडणवीस यांनी सपत्नीक दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवाय फडणवीस संघााचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत.
तसेच देवेंद्र फडणवीस यांना राजकीय डाव-पेच माहिती असून त्यांना यापूर्वी पक्ष संघटनेचे काम केले आहे भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीस हे योग्य नेते असल्याची चर्चा सुरु झाली.