नागपूर :अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. या घटनांतर चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.
सैफ अली खान यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या व्रांद्रे भागात या घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे?, मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपद सोडावे अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे.
भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे लाडके पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रिय आहेत असा आरोपही पटोले यांनी केला आहे.