Advertisement
नागपूर : शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला.त्यांनी केलेल्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत विरोधकांना क्लिप्स बाहेर काढण्याचा इशारा दिला. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
तसेच पटोले यांनी अनिल देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. गुरूवारी नागपुरात बोलताना नाना म्हणाले, ”
देशमुख जे काही बोलले ते बरोबर आहे. त्यांनी केलेले आरोप खरेच सिद्ध होतील, त्याचवेळी काँग्रेस नेत्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांना धमकावल्याचा आरोप करत हे सर्व थांबवायला पाहिजे असे म्हटले आहे.