नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झाले. यापार्श्वभूमीवर नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘महाराष्ट्राचे महाचाण्यक्य’ म्हणत ठिकठिकणी बॅनर लावले आहे.
बुटीबोरी नगर पंचायतीचे अध्यक्ष व भाजप नेते बबलू गौतम यांनी हा फलक लावले आहेत. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एक वर्षात दोन पक्षात मोठी फूट घडवून आणली व त्यांना भाजपसोबत आणले. त्यामुळेच ते चाणक्य ठरतात, असे फलकावर नमुद करण्यात आले.
गौतम यांनी फडणवीस यांचे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले होते. मात्र खुद्द फडणवीस यांनी त्यांना हे फलक काढायला सांगितले होते.