Advertisement
नागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास असून भाजप कोणतेही सरप्राईज देणार नाही, असेही ते म्हणाले.
एखाद्या विभागाबाबत तुमच्या स्वत:च्या मागण्या असतील, तर त्याचा अर्थ तुम्ही रागावला असा होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. ते सर्वांची काळजी घेतात. शिंदे यांचा सन्मान केला जाईल. शिंदे हे देखील सरकारचा एक भाग आहेत.
तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, 3 किंवा ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.