: माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी वृक्षारोपन करून श्री.फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपा प्रदेश सचिव तथा मनपा विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रभाग २६ मध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांची लागवड केली. प्रभागातील पँथर नगर, ऑरेंज नगर, अनमोल नगर, सावन नगर, पवनशक्ती नगर, चंद्रमणी नगर, पडोळे नगर, गिद्दोबा नगर, राधाकृष्ण नगर, अंतुजी नगर, अब्बूमिया नगर यासह अन्य भागांध्ये वृक्षारोपन करण्यात आले.
यासोबतच बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्योती किशोर तेटे, मेघल चंद्रशेखर पातोडे आणि करीना सुरेश वंजारी या प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना शाल व श्रीफळ देउन यावेळी सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, बलराम निषाद, विक्रम डुंबरे, किशोर सायगन, मौसमी वासनिक, खुशाल वेळेकर, दिनेश येवले, सुशील गुघाणे, राम सामंत व बरेच पदाधिकारी उपस्थित होते.