मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये काल संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आज त्यांनी माघार घेतली आहे.
आज सकाळी भांबेरी गावातून परत त्यांच्या अंतरवली सराटी या गावी परताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. यावेळी बोलताना “संचारबंदी का लावली? कारण काय? अंबड तालुक्यात संचारबंदी लावली म्हणजे आम्हाला मुंबईत येऊ द्यायच नाही. फडणवीसांनी रात्री बंदुकीची फोटो टाकला. दम होता तर थांबायच, आम्हाला येऊ द्यायच नाही. हा प्रयोग रात्रीच होणार होता. मराठ्यांनी डाव यशस्वी होऊ दिला नाही, असेही जरांगे म्हणाले.
फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये-
तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. बघतो सत्ता कशी येते, दम लागतो. एक तासात सांगंतो, तो रात्रीच करणार होता. जनता काम केल्यावर आदर करते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.त्यांनी मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारादेखील त्यांनी फडणवीसांना दिला.