श्री दक्षिणामूर्ती मंडळाच्या दिलखुलास मुलाखतीत उलगडले अंतरंगातील मर्मबंध
नागपूर: एकदा माझ्याकडे पक्ष्ाचे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले आम्हाला निखिल गडकरीला भाजप शहर युवा मोर्चाचा अध्यक्ष् करायचा आहे, परवानगी द्या,मी त्यांना म्हणालो,बिल्कूल करा पण मला निवृत्त करा…मी पक्ष्ात राहणार नाही! माझी ईच्छा होती माझ्या घरातून कोणीही राजकारणात येऊ नये. यायचे असल्यास स्वत:च्या बळावर यावे, गडकरीचा मुलगा आहे म्हणून नव्हे, देवेंद्र हा गंगाधरराव यांचा मुलगा असल्यामुळे राजकारणात आला नाही किंवा प्रवीण दटके हा देखील प्रभाकरराव यांचा मुलगा असल्यामुळे राजकारणात त्याला संधी मिळाली नाही तर देवेंद्र असो किंवा प्रवीण यांच्यात मूळात राजकारणाची उपजत प्रतिभा होती, ती त्यांनी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, महापौर म्हणून, राजकारणी म्हणून सिद्ध केली त्यामुळे त्यांचे कर्तृत्व लोकांनीही मान्य केले, कोणाचा मुलगा असणे यात काही चुकीचे नाही,असे अंतरंगातीर्ल मर्मबंध केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवार दि. ७ सप्टेंबर रोजी महाल येथील श्री दक्ष्णिामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित प्रकट मुलाखतीत उलगडले.
ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी ‘येत्या निवडणूकीत नवीन चेहरे देण्याचा विचार आहे का?’या सूचक प्रश्नावर बोलते केले होते. ज्येष्ठ निवेदिका रेणूका देशकर व बाळ कुळकर्णी यांनी अडीच तास रंगलेल्या मुलाखतीत ‘स्वत:मधला गडकरी’ उलगडून दाखविण्यास बाध्य केले . जे पाहिजे ते खालले, जे वाटतं ते बोललो,जे वाटलं ते केलं, असे सांगत ‘मैं तो चला जिधर चले रस्ता’असेस जगणे पसंद केले,मात्र हल्ली पहील्या पेक्ष्ा कुटुंबाला आता जास्त वेळ देत असल्याचे त्यांनी कबूल केले.
मुलगी,जावई, सूना,नातवंडं यांच्यात आता जास्त रमतो, म्हणूनच दिवसभर निवेदन घेऊन येणारे यांना सक्तीची विनंत केली आहे, ठराविक वेळ दिली त्याच वेळी येत जा, खूपच जास्त अडचण असेल तर मी उपलब्ध आहेच,पूर्वी माझी मुले लहान होती तेव्हा ती नेहमी म्हणायची ‘ काँग्रेस निवडून आली पाहीजे’ मला कळायचेच नाही का असे बोलतात आहेत,मग कळाले काँग्रेस जिंकली की बाबा घरी राहतात! आता प्रवास कमी करतो, खाण्यावर नियंत्रण आलं, आपल्यानंतर काय होईल?याची तमा बाळगत नाही. आजची पिढी ही आमच्यापेक्ष्ाही दहा पटींनी चांगलं काम करतात.राजकारणात जुने जाणार नवे येणार हे चालतच राहणार आहे.आमच्या आधी चांगले नेते होते, जर नेर्तृत्वाला वाटत असेल की माझ्या प्रभागात किवा पक्ष्ात माझा प्रतिस्पर्धी उभा नाही झाला पाहिजे तर असे होणार नाही कारण ‘काही काळ संधी असते..आयुष्य ही रेल्वेची गाडी आहे, कोणी दोन तर कोणी चार स्टेशननंतर उतरतं…चढणारे माणसाने उतरण्याची मन:स्थिती तयार केली पाहिजे’असा वडीजवजा सल्ला या वेळी गडकरी यांनी दिला.
दक्षिणामूर्ती मंडळाशी विशेष जिव्हाळा-
मी सहसा मंडळांच्या कार्यक्रमात जात नाही कारण एका मंडळात गेलो तर दहा मंडळवाले बोलवतात मात्र श्री दक्ष्णिामूर्ती मंडळाशी माझा अगदी लहानपणापासूनच विशेष जिव्हाळा आहे. मंडळातर्फे आजपर्यंत दर्जेदार तसेच संस्कार घडविणारे कार्यक्रम सादर झाले. याच महालात बडकस चौकात पूर्वी देवी बसत असे. कोण्या सट्टेबाजतर्फे ती बसवली जात असे. संपूर्ण दहा दिवस तिथे फक्त फिल्मी गाण्यांवर रॅकॉर्डिंग डांस सादर होत असत,हे योग्य नाही.
या मंडळाला खूप मोठी प्रबोधनाचीही पार्श्वभूमी आहे. आई मला लहानपणी हेच प्रबोधन ऐकण्यास सोबत घेऊन येत असे. ते बाळकडू पुढे राजकीय व सामाजिक जिवन जगताना अतिशय उपयोगी पडले. मंडळातर्फे फक्त मनोरंजन नव्हे तर ‘माणूस’घडवणे अपेक्ष्ति आहे. प्रबोधन,प्रशिक्ष् ण ,संस्कार घडविण्याबाबत हे मंडळ शंभराव्या वर्षी देखील कटीबद्ध आहे त्यामुळेच मी येथे आर्वजून उपस्थित झालो. मंडळांच्या प्रबोधनातूनच मोठे आदर्श निर्माण होणार आहेत. संगीत,नाटक,वाद विवाद स्पर्धा,व्याख्यान,कीर्तन यातूनच संस्कार घडत असतात.लहानपणी साळवापूरकर गुरुजींनी शिकवलेले ‘पसायदान’ आजही मला पाठ आहे.गिजरे मास्तरांनी शिकवलेले ‘अर्थवर्शीष’ मी नुकतेच दगडू शेठ हलवाईच्या गणपती आरतीत पूर्ण म्हटले.
यावेळी खासदार सांस्कृतिक महोत्सवात एक हजार व्हायोलिन,तबला, सतार वाजवणारे यांना मंच उपलब्ध करुन देणार आहे. नागपूरात दक्ष्णि मध्य केंद्र सांस्कृतिक मंडळ हे देखील दर्जेदार कार्यक्रम सादर करतात. शाळांमध्ये टिळक,गांधी,सावरकर यांच्यावरील लघूपट दाखवण्यिाची मी सूचना केली आहे. मी स्वत:‘आनंद’हा चित्रपट थर्ड क्लासचे तिकीट घेऊन पाच वेळा पाहीला आहे.त्यात एक तत्वज्ञान होते. चांगले चित्रपट,संगीत,नृत्य,नाटिका,साहित्य,कविता या मंडळांच्या माध्यामातून लोकांसमोर आले पाहिजे,हल्ली तर टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला मात्र आता टिळकांवरच ‘लोकं हो मला क्ष् मा करा’ही विडंबन एकपात्री प्रयोग सादर करण्याची वेळ आज आली असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली.
भारतीय खाद्य संस्कृतीला जगात कुठेही तोड नाही-
मी याच स्टेडियमध्ये क्रिकेट खेळायला यायचो तेव्हा इथल्या वसंत रेस्टॉरेंटमध्ये २५ पैशात समोसा मिळायचा. नाना पुरोति यांच्याकडे आलू बोंडा व त्यावर ताकाची चटणी मिळत असे. ते सकाळी ७ वा. दूकान उघडत असत. ती चव मी अजूनही विसरलो नाही. महाल भूभागाशी माझे कायमचे ऋणानुबंध जुळले आहेत ‘मी पुन्हा एका वर्षात महालात राहायला ये त आहो’एकदा बिल गेट्स त्यांच्या पत्नीसोबत घरी आले असता त्यांना कांचन यांनी आलूपोहे व चण्याचा रस्सा खायला दिला, गेट्स यांच्या पत्नीने तो अतिशय आवडीने खालला व गेट्सलाच दाटले,इंडियन नाश्ता बघा किती चविष्ट असतो’ .
आपल्या पदार्थांची चव लंडनमध्ये ‘ढिशूम’ रेस्टॉरेंट मध्येही मिळते.वडापावची तूफान विक्री या ठिकाणी होते.ईजराईलमध्ये नीना पुष्कर यांची भारतीय पदार्थांची चव देणारी ९ रेस्टॉरेंट आहेत. त्यांनी १३ प्रकारची तर भजीच मला खाऊ घातली.सावजीतर ब्रॅडिंग देशाबाहेर झालचं पाहिजे. सावजी मसाल्याची फ्रेन्चाईझी तयार करण्याची सूचना ही मी केली आहे. सुरेश प्रभू हे पत्नीसोबत घरी आले असता, याचा रस्सा त्यांनी पाच दिवस पूरवून खाल्ला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.जॅकी श्र्ाफ,अनिल कपूर,सलमान खान,हेमा मालिनी,विवेक ओबराय,कीर्ती आजाद यांनाही कांचन यांनी केलेले खाद्य पदार्थ हवे असतात.
रानू मंडळ यांचा आवाज खरोखरच खूपच गोड-
एका रात्रीत सोशल मिडीयावर चर्चित झालेल्या रानू मंडळ यांच्या उल्लेख गडकरी यांनी आपल्या मुलाखतीत अावर्जून केला.हूनर असेल, प्रतिभा असेल तर पहील्या स्थानावर पोहोचण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. क्ष्ेत्र कोणतेही असू द्या गूण,कौशल्य महत्वाचे.रानू मंडळ यांचा आवाज खरोखरच खूप गोड असल्याचे ते म्हणाले. मी स्वत:सकाळी योगा करताना जूनी गाणी एेकत असतो.संगीत ही मनाला आनंद देणारीच कला आहे. वामन पै सद् गुरु म्हणाले तसेच आपणच आपल्या जिवनाचा शिल्पकार असतो.
यावेळी विरोधी पक्ष्,पुढील स्वप्ने,जीवनातील आदर्श व्यक्ती,अपयश इ.विषयांवर भरभरुन बोलणारे गडकरी यांनी शेवटी तरुणाईला संदेश देताना यश-अपयश,अंधार-उजेड, जय-पराजय हे चालतंच राहील,वाहतूकीचे नियम पाळा असा सल्ला दिला, माझे आणि माझ्या कुटुंबियांचे प्राण वाचले यासाठी मी कमावले आर्शिवादच मला कामी पडले असे ते म्हणाले. स्व:चे कट्आऊट्स लावण्यापेक्ष्ा लोकांनी ती लावली पाहिजे.स्वप्नं अमर असतात ती पूर्ण करा.अश्या नेत्यांना मग लोकंही विसरत नाही.