Advertisement
नागपूर : नागपूरकरांचे आराध्य दैवत तसेच प्राचीन मंदिरांपैकी एक अशी ओळख गणेश टेकडी मंदिराची आहे. यापार्श्वभूमीवर मंदिरात पौष महिन्यातली संकष्टी चतुर्थी तीळ चतुर्थी म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्ताने टेकडी गणेश मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. बाप्पाची मूर्ती आणि मंदीर परिसराला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली.
भाविकांच्या सुरक्षेसाठीपोलिसांसोबतच स्वयंसेवकही मंदीर परीसरात तैनात करण्यात आले आहेत. सोबतच या सर्व परिसरावर 50 सीसीटीव्ही कॅमेरांचीही नजर आहे.
दरम्यान टेकडीच्या गणपतीचा 350 वर्षे जुना इतिहास आहे. ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून