नागपूर : शहरात नुकताच मोठ्या जल्लोषात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता अयोध्येतून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाच्या पादुका कॅपिटल हाइट्स येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी भव्य रथावरून पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती.
यादरम्यान आपल्या आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामाच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नागपूरकरांची गर्दी उसळी होती. सध्या श्री रामाच्या पादुका देशातील विविध ठिकाणी परिक्रमा (भ्रमण) करीत आहे.