नागपूर : राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. या घोटाळ्यात मुंडे यांचे समर्थक वाल्मिकी कराडने निविदा ठरवल्या, महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोप धस यांनी केला.
आरएसएसच्या भारतीय किसान संघाचे ‘ते’ पत्र फाडण्यात आले-
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदल केला. नॅनो युरिया खरेदीत २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा करण्यात आलेला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, वाल्मीक कराड यांनी हे पत्र फाडून टाकल्याचा आरोप आमदार धस यांनी केला.धनंजय मुंडे यांनी संघाचे हे पत्र वर पर्यंत जाऊच दिले नाही, असे धस म्हणाले.
कृषी विभागाला आव्हान देतो, हे पत्र तुमच्याकडे आहे का? असेही धस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणी केली. धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बदल्यांसाठी चेरेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडे सापडले. या बदल्यांमधून मिळणारा पैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे जात होता, असा दावा त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी –
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पाहता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी स्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देत नाहीत, असा सवालही धस यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार –
धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बदल्यांसाठी चेरेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडे सापडले. या बदल्यांमधून मिळणारा पैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे जात होता, असा दावा त्यांनी केला.राज्यात ठराविक एजंटांची नेमणूक करण्यात आली होती. या सर्वांचे कॉल डिटेल्स तपासा. १०० कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार यात आहे. वाल्मीक कराड याने निविदा ठरवल्या. गैरव्यवहार केवळ बीड पुरता नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला होता. आता कागदाचा लढा सुरू झाला आहे, खटला दाखल झाला तरी मी माघार घेणार नाही, असे धस म्हणाले. धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियां ऐवजी माझ्यावर खटला दाखल करावा, असे आव्हान दिले.
धनंजय मुंडे यांनी असा केला घोटाळा-
धनंजय मुंडे यांनी आता अर्ज आणि लगेच कर्ज या पद्धतीने सर्व प्रक्रिया केली. टेंडर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काढले. कुणालाही संशय येऊ नये याची काळजी घेतली. नॅनो युरियामध्ये २१ कोटी २६ लाख, डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख, बॅटरी खरेदीत ४५ कोटी ५३ लाखआणि कापूस साठवणुकीची ५७७रुपयांची बॅग १,२५० रुपयांना खरेदीकरण्यात आली. एकूण १८० कोटी ८ ३लाख रुपये धनंजय मुंडे आणि त्यांच्या टीमने बाहेर काढल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. रफिक नाईकवाडे हे या घोटाळ्यातील सूत्रधार असून, भामरेहे आजही त्यांच्यासोबत आहेत, असा दावा धस यांनी केला.