नाशिक: कर्जमाफीसह आपल्या न्यायहक्कांसाठी लढणार्या शेतकर्यांवर अमानुष लाठीमार गंभीर गुन्हे दाखल करून भाजपा सरकार हिटलरासारखे वागत आहे. आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर झालेल्या अन्यायाची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी करतानाच शेतकर्यांना न्याय मिळवुन दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
संपुर्ण राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपा दरम्यान आंदोलन करणार्या येवला तालुक्यातील शेतकर्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला, खोटी गुन्हे दाखल केले, दहशद निर्माण केली. त्यामुळे प्रचंड दबावाखाली असलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांनी आज येवला तालुक्याचा दौरा केला. उंदीरवाडी व पंचक्रोशीतील शेतकर्यांशी संवाद साधला या आंदोलनात सहभागी झालेल्या व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या पिंप्रीच्या नवनाथ भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत आ.पंकज भुजबख, आ.जयवंत जाधव, नानासाहेब महाले व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलना दरम्यान शेतकर्यांवर खोटे गुन्हे, अमानुष लाठीमार करणार्या पोलिसांवर कारवाई करण्याची व घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. शेतकर्यांनो तुम्ही घाबरू नका तुम्हाला न्याय मिळवुन दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाही, खोटे गुन्हे मागे घेण्यास सरकारला भाग पाडु असे त्यांनी शेतकर्यांशी बोलतांना सांगितले.
येवला येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सरकार कर्जमाफीसाठी अभ्यास गट, मंत्री गट स्थापन करून वेळकाडुपणा करत आहे. त्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही असा आरोप केला. शेतकरी संपाबाबत विरोधकांशी चर्चा करणार नाही या भुमिकेचा समाचार घेताना आम्ही विरोधक म्हणजे काय पाकिस्तानातील आहोत का ? असा सवाल करतानाच गेल्या निवडणुकीत विरोधकांना 37 टक्के मते मिळाली होती आणि भाजपाला 26 टक्के मते मिळाली होती हे लक्षात ठेवावे असे ही त्यांनी सुनावले.
उत्पादनावर खर्च अधिक 50 टक्के हमीभाव देऊ असे सांगुन मते घेणार्या मोदी सरकारने सुप्रिम कोर्टात मात्र असा हमीभाव देता येणार नाही असे सांगुन शेतकर्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. फ क्त व्यापार्यांना एल.बी.टी माफी दिली त्यापोटी विविध कर लावुन शेतकरी आणि मध्यमवर्गीय यांच्या खिशातुन वर्षाला दहा हजार कोटी रूपये काढले जात असल्याचेही ते म्हणाले.
शेतकर्यांच्या व्यथा ऐकुन ना.मुंडे व्यथित
आंदोलना दरम्यान पोलिसांनी किती अमानुषपणे मारहाण केली याचे वळ शेतकर्यांनी दाखवताच ना.मुंडे हे ही व्यथित झाले. काही महिलांना आपल्या भावना व्यक्त करतांना आश्रु अवरता आले नाहीत.