मुंबई : संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या. अखेर मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
धंनजय मुंडेंना राजीनामा द्यायला इतके दिवस का लागले? असा सवाल विरोधक करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्पष्टीकरण दिले. मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन तीन महिने झाल्यानंतर राजीनामा दिला. त्यांना राजीनामा देण्यासाठी धमकी द्यावी लागली का, असा सवाल फडणवीस यांनी केला असता ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की, चुकीच्या वेळी झाला. याच्या चर्चेत मी जात नाही.
राजकारणात, पहिल्या दिवशी राजीनामा घेतला किंवा शेवटच्या दिवशी घेतला तरी लोकांना जे बोलायचं ते बोलतात. या हत्येतील जे फोटो समोर आले, ज्या प्रकारे हत्या झाली आणि हत्येचा मास्टरमाईंड ज्याला म्हटले गेले, तो मंत्र्यांचा इतका जवळ होता की, मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे दिला पाहिजे. युतीचं सरकार असल्याने आम्हाला निर्णय घ्यालायला उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केलं आणि मुंडेंनी राजीनामा दिला, असं फडणवीस म्हणाले.