मंत्री मुनगंटीवार आणि कुटे यांची घेतली भेंट
नागपुर: खासदार पदमश्री डॉ.विकास महात्मे यांनी धनगर संर्घष समिती च्या पदाधिकारया सोबत मुंबई येथे वित्त मंत्री सुधीर मुनगुट्टीवार ची भेंट करून अदिवासीं प्रमाणे सवलती करीता 1000 कोटी मंजुर करुन त्वरीत 500 कोटी उपलब्ध करुन दिल्या बददल आभार मानले, ह्या सवलती त्वरीत अमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी असे सांगितले . विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागस वर्गीय कल्याण मंत्री संजय कुटे साहेब यांची भेट घेवुन धनगर समाजाच्या विविध (एसटी प्रमाणे सवलत योजना) योजनासाठी दर वर्षी 1000 कोटी रुपयाची तरतुद केल्या बददल भेंट करून आभार मानले .
यावेळी खासदार डॉ महात्मे यांनी तळागाळातील धनगर समाजापर्यन्त योजना पोहाचल्या पाहिजेच असे सुचवले,महाराष्ट्रातील ठेल्लारी समाज हा एन. टी. ब मधुन एन.टी.क मध्ये समाविष्ट करण्यास आग्राहाची मागणी केली.या पुर्वी मागासवर्गीय आयोगाकडे केलेल्या पठपुराव्याची मागणी केली मांडली, मंत्री कुटे यांनी तत्वरीत सचिवाची बैठक द लावुन सर्व योजनावर सुक्ष्म चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्याचे मान्य केले.
सदर बैठकीत, सर्व संबधीत विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते, मेंढपाळ ठेल्लारी समाजालाही महाराष्ट्र शासनाने आदिवासी सवलतीच्या ज्या योजना आहेत त्या धनगर समाजा प्रमाणे ठेल्लारी समाजालाही त्वरीत लागु करण्यास सांगितले, सचिव अरुण डुबे, सुनिल भजनावळे यांच्याशी चर्चा केली, सांस्कृतिक भावनाच्या कामाचाही आढावा घेतला,नियोजन भवन येथे जावुन संबंधित सचिवाना सुचना दिल्या सांस्कृतिक भवनाचे काम तांत्रिक दृष्ट्या थांबले आहे, त्या विषयी संपूर्ण महाराष्ट्रातील PWD विगातील मुख्य सचिवाची लवकरच बैठक बोलवुन तोडगा काढण्यात येणार आहे . बैठकीत परभणी धनगर संर्घष समिति जिल्हा अध्यक्ष आनंद गायकवाड ,ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी उपस्थित होते.