Published On : Fri, Nov 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

धनत्रयोदशी आज; शुभ मुहूर्त, पूजा विधी ‘हे’ आहेत महत्त्व !

नागपूर : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून आज धनत्रयोदशी सर्वात प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे, जो देशभरात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मीजी आणि कुबेर महाराज यांची पूजा केली जाते. तसेच कोणत्याही वस्तू खरेदीसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. यावेळी धनत्रयोदशी आज 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन भांडी, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्त 2023- धत्रयोदशी तिथी प्रारंभ – 10 नोव्हेंबर 2023 दुपारी 12:35 पासून सुरु होणार आहे.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धनतेरस 2023 पुजन मुहूर्त- आज धनत्रयोदशीच्या पूजेची वेळ संध्याकाळी 5:47 ते 7:43 पर्यंत असेल. ज्याचा कालावधी 1 तास 56 मिनिटे असेल. प्रदोष काल- संध्याकाळी 05:30 पासून सुरू होणारा आणि रात्री 08:08 पर्यंत असेल.

पूजा विधी –
धनत्रयोदशीच्या दिवशी घराची स्वच्छता करावी, सकाळी आंघोळ करावी व स्वच्छ कपडे परिधान करावेत. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळात शुभ मुहूर्तावर कुबेर आणि धन्वंतरी देवाची मूर्ती उत्तर दिशेला बसवावी. तसेच लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर दिवा लावून विधिवत पूजा सुरू करावी.सर्व देवांना तिलक लावावा. यानंतर फुले, फळे अर्पण करावे. भगवान कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करा.पूजेदरम्यान ‘ओम ह्रीं कुबेराय नमः’ या मंत्राचा जप करत राहा.भगवान धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.

धनत्रयोदशीचे महत्त्व-
पौराणिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, कोषाध्यक्ष कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी व्यवस्थित पूजा केल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही

Advertisement