नागपूर : भाजपचे पदाधिकारी सना खान यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अद्यापही उलघडा झालेला नाही. या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी अमित शाहू याच्याकडून पोलिसांना हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची माहिती आहे. हे लक्षात घेता नागपूर पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सत्य बाहेर काढण्यासाठी लाय डिटेक्टर टेस्ट किंवा पॉलिग्राफ चाचणीची आवश्यकता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.यासाठी पोलिसांनी न्यायालयात परवानगीसाठी धाव घेतली आहे.
अमित शाहू याच्या आईच्या घरातून पोलिसांना एक मोबाईल व लॅपटॉप सापडला आहे. संबंधित मोबाईल सना खान यांचा आहे का याची सायबर तज्ज्ञांकंडून चाचणी करण्यात येणार आहे.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात अमित शाहूने जबलपूर येथे पैश्याच्या वादातून सना खानची हत्या केली. शाहूने आपल्या मित्रांच्या मदतीने सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकला. पोलिसांनी बरेच दिवस शोधमोहीम राबवली, मात्र सना खानचा मृतदेह सापडला नाही.