Published On : Sat, Nov 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सत्तर वर्षापासून आमचे आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला संतप्त सवाल

Advertisement

मुंबई : मराठ्यांना ७० वर्षापासून आरक्षण होतं. पण, जाणूनबुजून षडयंत्र रचण्यात आलं. ७० ते ७५ वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांचा प्रचंड दबाव होता. मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही. आमचे आरक्षण खाताना काही वाटलं नाही का? आरक्षणासाठी आमच्या तरूणांचे मुडदे पडत आहेत, असे विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केले. सत्तर वर्षे आमचं वाटोळं कुणी केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठ्यांच्या लाखांनी नोंदी आढळून येत आहेत. मराठ्यांना दोन अंग आहेत. मराठा क्षत्रिय असल्याने त्यांना लढायचं सुद्धा माहिती आहे. मराठा समाज शेतीही करतो. पण, मराठ्यांची मुले मोठी झाली, तर आपले काय होणार? म्हणून षडयंत्र रचण्यात आले आहे, असा घाणघातही मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

Today’s Rate
Tuesday 12 Nov. 2024
Gold 24 KT 75,900 /-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 90,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सत्तर वर्षे आमचं झालेलं नुकसान सरकार कसे भरून काढणार आहे? आमच्या जागा कुणी बळकावल्या? २४ डिसेंबरला सरकारला मराठा आरक्षणासाठी कायदा तयार करणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी गाफील राहू नका, असे आवाहनही जरांगे-पाटलांनी मराठा बांधवाना केले.

मराठ्यांना आरक्षण असतानाही पुरावे लपवून ठेवण्यात आले. समित्यांनी पुरावे शोधण्याचे काम केले . पण, सरकारकडे अहवाल आल्यावर पुरावे नसल्याचं सांगितलं जायचं. मग, आता कसे काय पुरावे आढळत आहेत? याचे उत्तर सरकारने द्यावे,असेही जरांगे-पाटील म्हणाले आहेत.

Advertisement