नागपूर: मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना चहा पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपुरातील डॉली चहावाला प्रसिद्धी झोतात आला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉली सोबतची एक रिल सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यानंतर जगभरात डॉली चहावाल्याची चर्चा रंगली.बिल गेट्स सोबतच्या व्हायरल व्हिडीओ मागचा किस्सा डॉली चहावाल्याने प्रसार माध्यमांना सांगितला.
हैदराबादला एका इव्हेंटसाठी जायचे आहे, अशी माहिती डॉलीला देण्यात आली. एका हॉटेलमध्ये डॉलीच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवस शुटींग चालले. डॉली समोर उभ्या असलेल्या ८ परदेशी व्यक्तींपैकी बिल गेट्स कोण हेही त्याला माहीत नव्हते.त्यानंतर डॉली आणि बिल गेट्स यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिल गेट्स यांनी स्वतःच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केल्याने डॉलीच्या हटक्या स्टाइलची जगभरात चर्चा रंगली. बिल गेट्स कोण आहेत याची माहिती त्याला मिळाल्यानंतर त्याच्या पाया खालची जमीनच सरखली.
दरम्यान नेहमीप्रमाणे व्हीसीए मैदानाजवळील आपल्या ‘डॉली की टपरी’ येथे आपल्या हटक्या स्टाइलने चहा विकायला सुरुवातही केली आहे.