नागपूर: नागपूर रेल्वे स्टेशनवर स्थानकावरून
रविवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी जाणाऱ्या डिझेलने भरलेल्या मालगाडीच्या कंटेनरमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.प्लॅटफॉर्मवर डिझेल गळती होऊन आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकारी तातडीने मदत करण्यास धावले.काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन पथकाला यश मिळवले आहे. ज्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. तथापि, या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली.
आग लागली तेव्हा तेलंगणा एक्सप्रेस स्टेशनवर थांबली होती. त्याचवेळी डिझेलने भरलेली मालगाडी तेथून जात असताना, या ट्रेनच्या पेंट्री कारमध्ये आग लागल्याची अफवा पसरली.
यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.काही प्रवाशांनी घाईघाईने ट्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि स्टेशनवर कोणताही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी आगीच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.