– उद्या गोंदियात होणार दाखल
नागपूर: ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना ‘मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक्क समजावून सांगण्यासाठी ‘मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात काढण्यात आलेल्या मंडल यात्रेला आज 1 आँगस्टरोजी नागपूरातील सविंधान चौकातून शुभारंभ करण्यात आले.या मंडल यात्रेला सविंधान चौकात माजी खासदार डाॅ.विकास महात्मे,विधानपरिषद आमदार अभिजित वंजारी,विधानपरिषद आमदार डाॅ.परिणय फुके,जेष्ठ मार्गदर्शक नागेश चौधरी,संध्या राजुरकर,ईश्वर बाळबुध्दे,शैल जैमिनी,प्रा.ज्ञानेश वाकुडकर,प्रा.रमेश पिसे आदीनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली.यावेळी ,सदाशिव हिवलेकर,संजय शेंडे,प्रभाकर मांडरे,प्रदिप गायकवाड,अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष प्रा.नामदेव राऊत,राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेचे उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी,कृष्णाजी बेले,वंदना वनकर,सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण,अ्रड.अंजली साळवे,अर्चना कोठेवार,विजय बाभुळकर,डॉ रवी वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.संविधान चौकातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.मडल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधीनी ओबीसींच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला शुभेच्छा देत ओबीसी जनगणनेसाठी सर्वांनीच आपली शक्ती पणाला लावण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.तसेच या मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी युवकांंना विविध योजनांची माहिती मिळणार असल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
हि मंडल यात्रा आज १ ऑगस्ट रोजी मौदा मार्गै भंडारा जिल्ह्यात दाखल झाली असून भंडारा येथे सायकांळी मार्गदर्शन सभेत जनजागृती करणार आहे.तसेच ही यात्रा उद्या 2 आँगस्टला भंडारा,तुमसर मोहाडी मार्गे गोंदिया जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.या मंडंल यात्रेसोबत ओबीसी युवा अधिकार मंचचे सयोंजक उमेश कोर्राम,संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे,मुकुंद आडेवार,बळीराज धोटे,वंदना वनकर,धिरज भिसीकर,संजु भुरे,रमेश पिसे आदी मान्यवर आहेत.
ओबीसी व्हीजेएनटी,एसबीसी समाजातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपायावर चर्चा, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जागृती, ओबीसींचे वसतिगृह, महाज्योती आणि ओबीसी आर्थिक विकास महामंळाच्या योजना, शिष्यवृत्तीचा लाभ, ओबीसींची जनगणना तसेच यात्रेच्या माध्यमातून ओबीसी हितासाठी गठित बी.पी. मंडल आयोगाच्या शिफारशींची माहिती ओबीसी समाजाला देऊन या शिफारशी शासनाने लागू करण्याची आवश्यकता या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे..या यात्रेच्या यशस्वीतेसाठी ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी अधिकार मंच,संघर्ष वाहिनी,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संविधान मंच, स्टु़डटंस राईटस असो.सेल्परिसपेक्ट मुव्हमेंट,भोयर पवार महासंघ,सर्व समाज ओबीसी मंच,ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ,ओबीसी विद्यार्थी संघटना,भटके विमुक्त परिषद, आता लढूया एकीनेच सारख्या अन्य बहुजन ओबीसी संघटनां प्रयत्न करीत आहेत.