नागपूर : दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावरून काल आंबेडकर अनुयायांनी आंदोलन केले. यावेळी बांधकाम स्थळाची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाेलिसांनी दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी लावली असून चारही भागाला छावणीचे स्वरूप आले आहे.
दीक्षाभूमीवर होणाऱ्या भूमिगत पार्किगमुळे स्तूपाला धोका निर्माण होणार असल्याने हजाराे आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात तीव्र आंदाेलन केले. बांधकाम साहित्याची जाळपाेळ करून बांधकामांच्या साहित्यांची तोडफोड केली. त्यामुळे दिवसभर या परिसरात तणावाचे वातावरण हाेते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याच्या घाेषणेनंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात कडेकाेट बंदाेबस्त करण्यात आला.
सकाळपासून चारही बाजुने दीक्षाभूमिकडे जाणारे मार्ग बंद करून प्रवेशबंदी लावण्यात आली. काछीपुरा चाैक ते अण्णाभाऊ साठे स्मारक चाैक ते लक्ष्मीनगर व लक्ष्मीनगर ते बजाजनगर हे मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले. कुणालाही आतमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.