नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या ‘युवा झेप प्रतिष्ठान’मार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दीनदयाळ थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
येथे नाममात्र शुल्काच्या बदल्यात त्यांना भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाते. तर ह्या योजनेचा जनतेला कितपत लाभ होतोय ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नागपूर टुडे [NT] टीमने केला ऑन स्पॉट “Reality check”.
येथे दररोज १००० माणसांच्या भोजनाची व्यवस्था आहे. यासाठी केवळ १० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे बाहेरून उपचारांसाठी आलेल्या गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.
एकंदर पाहता दीनदयाळ थाळी योजनेचा लाभ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. तसेच सदर केंद्र नियमितपणे चालविण्यावर जास्त भर असल्याची स्पष्टोक्ती संदीप जोशी यांनी दिली आहे.
परंतु या योजनेचा विस्तार इतर हॉस्पिटल्स आणि आवश्यक ठिकाणी व्हावा व थाळी केंद्र केवळ सकाळपुरतेच मर्यादित न राहता ही सेवा संध्याकाळी देखील सुरु करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.