कामठी :- *कामठी तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतने आज आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंपग कल्याण निधीचा 2012-13 ते 2015- 16 चा पहिला टप्प्या 34 अपंगांना प्रत्येकी 3045 रू प्रमाणे समान निधीचा वाटप करण्यात आला. प्रहार चे कामठी तालुका प्रमुख छत्रपाल करडभाजने यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आलेले हे यश असल्याने सर्व अपंग बांधवांनी छत्रपाल करडभाजने यांचे आभार मानले.
निधीचा धनादेश सरपंच वनिताताई इंगोले,उपसरपंच विशाल चामट व ग्रामसेवक यांच्या हस्ते वाटप करण्यात आला.
उर्वरित रक्कम 15 ऑगस्ट पुर्वी वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगीतले. यावेळेस प्रहार चे तालुकाप्रमुख छत्रपाल करडभाजने चिखली ग्रामपंचायत सरपंच विलास भोयर, प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे देवीदास वैद्य,सुशील फुलबांधे, आकाश गभने, रामा झाडे, राहुल ठाकरे, राहुल दुरबूडे, ईत्यादी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी