नाशिक: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध आघाड्या व युतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु असून नाशिकच्या जागेवरून महायुतीत मतभेद निर्माण झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.
नाशिकमध्ये शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात हेमंत गोडसे यांच्या कामाचे कौतुक करताना श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे.
महाराष्ट्रात अब की बार ४५ पार करायचं आहे. त्यात हेमंत गोडसेही असतील,असे शिंदे म्हणाले.श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंच्या नावाची केलेली घोषणा काही स्थानिक भाजपा नेत्यांना पसंतीस पडली नाही.भाजपाचे स्थानिक पदाधिकारी दिनकर पाटील यांनी श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला विरोध केला आहे. जागावाटप होईल, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, त्यानंतर तो जाहीर होईल. तो निर्णय अंतिम असतो. त्यामुळे काल जे काही झालं, ते जनतेला मान्य नाही,असे पाटील म्हणाले.